स्वागताध्यक्ष

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan (ABMSS) Pimpri | Chairman-P.D.Patil Image
डॉ. पी. डी. पाटील

डॉ. पी. डी. पाटील
पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) येथे जानेवारी २०१६ मध्ये होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून पिंपरी (पुणे) येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांची निवड झाली आहे. त्यांचा परिचय...

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पिंपरी (पुणे) संस्थेचे अध्यक्ष असलेले डॉ. पी. डी. पाटील यांचा जन्म १९५३ साली सांगली जिल्ह्यातील सुसंस्कृत व प्रतिष्ठीत कुटुंबात झाला. डॉ. पाटील यांचे शिक्षण बी. एस्सी., एलएल. बी. आणि पीएच. डी. आहे. एक चांगला शिक्षणसंस्थाप्रमुख म्हणून स्वतःची घडण करण्याचे निश्चित उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून डॉ. पाटील यांचा ज्ञानक्षेत्रात आजपर्यंतचा प्रवास राहिला आहे.

सविस्तर वाचा

पिंपरी - चिंचवड विषयी

उद्यमनगरी ते साहित्यनगरी
यंदाचे ८९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान पिंपरी-चिंचवडकरांना मिळाला आहे. ही गोष्ट हेच सिद्ध करते,की सतत यंत्रांचा खडखडाट ऐकू येणार्‍या या उद्यमनगरीच्याआत्म्यामध्ये एक साहित्याचा सुस्वरदेखील अनुस्यूत आहे. ज्या दिवशी संमेलनस्थळ म्हणून निवड झाली तेव्हाच हा स्वर अनाहत नादासारखा आहे, हे सिद्ध झाले. १९८५ मध्ये पिंपरी- चिंचवड नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रूपांतर झाले तेव्हापासून आजपर्यंतचा या नगरीचा इतिहास विलक्षण आहे.


सविस्तर वाचा

डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठाविषयी

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan (ABMSS) Pimpri | DPU Logo Image‘ज्ञानाच्या माध्यमातून सबलीकरण’ हे ध्येय ठेवून ते साध्य करणारी यशस्वी वाटचाल डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने आजवर केली आहे. विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे हे विद्यापीठ केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर भारतातील नावाजलेले शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध पावले आहे.

सविस्तर वाचा